TO 

बुद्धिस्ट मंगल परिणय, मनीषनगर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८व्या वार्षिक वधू-वर परिचय मेळाव्यास समाजाच्या विविध स्तरांतून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याच्या सुरुवातीस बुद्धिस्ट मंगल परिणय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा वासे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे तसेच भावी उपवर-वधू आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक स्वागत केले. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सेंट पॉल स्कूलचे डायरेक्टर राजाभाऊ टाकसाळे, संघटन प्रमुख प्रभाकर वासे, विलास अकॅडेमीचे डायरेक्टर विलास बुकुंडे, विशेष पाहुणे शिवदास वासे, रिअल इस्टेटचे डायरेक्टर राजू वैद्य तसेच बहुजन सौरभचे सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सामूहिक त्रिशरण-पंचशील घेऊन करण्यात आले. या वेळी सभागृहात सामाजिक ऐक्य, समता आणि बांधिलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले. या मेळाव्यास भारतासह USA, UK, कॅनडा, नेदरलँड्स येथील इंजिनिअर, डॉक्टर, अधिकारी तसेच सर्वसामान्य वर्गातील उपवर-वधू आपल्या आई-वडिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे राजाभाऊ टाकसाळे म्हणाले, “आजच्या काळात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम होणे ही काळाची गरज आहे. भावी वर-वधूंनी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे समाज निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होईल.” यावेळी विशेष पाहुणे विलास बुकुंडे यांनी अध्यक्षा श्रीमती सुनंदा वासे मॅडम यांच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करत, बुद्धिस्ट मंगल परिणय ही संस्था केवळ विवाह जुळवणारी नसून विश्वास, मूल्ये आणि दीर्घकालीन नातेसंबंध जपणारी एक विश्वासार्ह संस्था असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘लाइफ पार्टनर’ या मार्गदर्शक पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. मेळाव्याचे सुयोग्य संचालन युवराज चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीटी ठवरे, एलीना ठवरे, अनिल खोब्रागडे, अनमोल शेंद्रे आणि अजिंक्य वासे यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Who we are

Buddhist Mangal Parinay The New Buddhist Marriage Centre (www.buddhistmangalparinay.com) is the largest and most trusted Buddhist Matrimonial Site for Buddhist Brides and Grooms with success stories. We have the widest choice of profiles of Engineer’s, Doctors, Officers, Lecturers, Architects, Businessmen including NRI’s etc. that matches your criteria & expectations.

Read More..

Latest Brides & Grooms

featured profile

BMP36575
  • Profile ID: BMP36575
  • Age: 28 Yrs.
  • Religion: Buddhist, Buddhist
  • Location: Nagpur and Mumbai , Maharashtra
BMP36298
  • Profile ID: BMP36298
  • Age: 32 Yrs.
  • Religion: Buddhist, Buddhist
  • Location: Nagpur, Maharashtra
BMP36664
  • Profile ID: BMP36664
  • Age: 28 Yrs.
  • Religion: Buddhist, Buddhist
  • Location: Nagpur, Maharashtra

A celebration of love for a better life

We respect your privacy. 100% Secure Match Making for Buddhist Community Only.

Verified & Secured Profile

We allow only Verified profiles to connect with you

Effective Search

Easy search to find your life partner faster based on your preference

Send Messages

Become a Premium Member & Start a Conversation

Meet & Marry

Start a new journey. Meet & Marry the most compatible partner